Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 03:40 PM2022-05-24T15:40:03+5:302022-05-24T16:07:34+5:30

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत.

Shiv Sena's Kolhapur district chief Sanjay Pawar has been active in the party for the last 30 years. | Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या!

Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या!

googlenewsNext

मुंबई/ कोल्हापूर- राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहाव्या उमेदवारासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून बोलावणे आल्याचे समजते आहे. संभाजीराजेंकडून शिवसेनेला होकार आला नसल्याने संजय पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे, असे असताना पवार यांनी संभाजीराजे आमचे राजे, दैवत आहेत. अपमान होईल असे वागणार नाही, असे म्हणत आपल्याला अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही संकेत आलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे. 

संभाजीराजेंना शह देईन एवढा मोठा मी नाही. ते आमचे राजे आहेत. संभाजीराजे किंवा मोठे राजे काय त्यांचे छोटे चिरंजीव देखील समोर आले तरी मी त्यांच्या पाया पडतो. हे शिवसैनिकावरील संस्कार आहेत. राजेंचा माझ्याकडून असा कुठला अपमान व्हावा अशी माझी अपेक्षा नाही, असे संजय पवार यांनी सांगितले. परंतू जर उद्धव ठाकरेंनी लढ म्हटले तर मला लढावेच लागेल, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. 

Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या ९ वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.

उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी संजय पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच संजय पवारांनी आनंद मानला. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल ३० वर्षे संजय पवार सहभागी आहेत. 

"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही- संभाजीराजे

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही. परंतू तशा कोणत्याही घडामोडी अजून तरी दिसत नाहीत. जे पक्ष उमेदवारीस पाठिंबा देतील, त्या पक्षांना सहयोग असू शकेल. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोगी सदस्यत्व नव्हे. त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हटल्यावर सभागृहात त्या पक्षांच्या धोरणांना पाठिंबा, मतदान त्या पक्षाच्या बाजूने या गोष्टी मला मान्य असतील. परंतू थेट कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्विकारणार नाही.

Web Title: Shiv Sena's Kolhapur district chief Sanjay Pawar has been active in the party for the last 30 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.