इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:54+5:302021-02-06T04:43:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : केंद्र शासनाकडून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल- डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या वतीने ...

Shiv Sena's morcha at the provincial office against the fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्र शासनाकडून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल- डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आंदोलकांनी एका बैलगाडीमध्ये मोटारसायकल ठेवून हालगी वाजवत सहभाग घेतला. तसेच जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

शिवसेना शहर कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून फिरून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात, मोदी सरकार सत्तेवर येताना दिलेली आश्वासने विसरून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटत जगणे अवघड करीत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरले असतानाही शासन सातत्याने दरवाढ करीत आहे. देशात कोरोनामुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. यामुळे शासनाने लवकर इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सयाजी चव्हाण, रवी माने, भाऊसाहेब आवळे, अण्णासाहेब बिलुरे, महादेव गौड, मंगल मुसळे, शोभा गोरे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

०५०२२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत शिवसेनेने पेट्रोल-डिझेल व गॅसवाढीच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

(छाया - उत्तम पाटील)

Web Title: Shiv Sena's morcha at the provincial office against the fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.