शिवसेनेची ‘माझे शहर- माझी जबाबदारी’ हेल्पलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:48+5:302021-04-07T04:24:48+5:30

कोल्हापूर : कोरोनाचे थैमान थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम सुरू आहे. ...

Shiv Sena's 'My City - My Responsibility' helpline | शिवसेनेची ‘माझे शहर- माझी जबाबदारी’ हेल्पलाइन

शिवसेनेची ‘माझे शहर- माझी जबाबदारी’ हेल्पलाइन

Next

कोल्हापूर : कोरोनाचे थैमान थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शहर शिवसेनेच्या वतीने ‘माझे शहर-माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरात हाती घेतली आहे. यामध्ये हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधून रुग्णसेवा आणि कोरोनाबाबतची अधिक माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

पत्रकात म्हटले की, कोरोनाचा पुन्हा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आणि नातेवाईक सैरभैर होतात. कोणत्या दवाखान्यात जागा उपलब्ध आहे, कोठे उपचार मिळतील, कोठे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकेसाठी कोणाला फोन करायचा, हॉस्पिटल बिलाच्या तक्रारी, यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता शिवसेनेशी संपर्क साधावा. कोल्हापूर शहरवासीयांसाठी ‘माझे शहर- माझी जबाबदारी’ ही हेल्पलाइन मोहीम शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी शिवसेनेच्या हेल्पलाइन किंवा नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले.

‘माझे शहर - माझी जबाबदारी’ हेल्पलाइन नंबर : ७०२८०३९०९९ /७०२८०४९०९९ /७०२८०६९९०९९ /७०२८०७९०९९

Web Title: Shiv Sena's 'My City - My Responsibility' helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.