आजी-माजी संचालकांसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: May 6, 2016 11:27 PM2016-05-06T23:27:38+5:302016-05-07T00:56:36+5:30

भादवण-गजरगाव गट : आजी-माजी संचालक आमनेसामने

Shiv Sena's reputation is with the grand-aged former directors | आजी-माजी संचालकांसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

आजी-माजी संचालकांसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

Next

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा --चार आजी-माजी संचालक, शिवसेना आणि एक ज्येष्ठ उद्योजक निवडणूक रिंगणात असलेल्या भादवण-गजरगाव गटामध्ये जिल्हा महिला काँगे्रसच्या अंजनाताई रेडेकर यांना यावेळी मताधिक्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार हे स्पष्ट आहे. सर्वांचीच प्रतिष्ठा या गटातून पणाला लागली आहे. स्व. वसंतराव देसाई महाआघाडीतून उद्योगपती बापूसाहेब सरदेसाई, शिवसेनेचे संजय पाटील आणि विद्यमान संचालक आनंदराव कुलकर्णी, तर विरोधी राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतून कै. केदारी रेडेकर संस्था सूमहाच्या अंजनाताई रेडेकर, भिवा जाधव हे विद्यमान संचालक आणि माजी संचालक एम. के. देसाई हे समोरासमोर आहेत.
अंजनाताई यांच्यासोबत असणारे आनंदराव कुलकर्णी थेट विरोधी आघाडीत दाखल झाले आहेत. गेली पाच वर्षे अंजनाताई यांना कारखान्यातील अंतर्गत सत्तासंघर्षाचा फटका निश्चितच बसला आहे. ग्रामपंचायतीपासून ते विविध संस्थांच्या निवडणुकांत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांनीही सोयीच्या भूमिका घेण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतील तीनही उमेदवार अनुभवी आहेत. संजय पाटील व बापूसाहेब सरदेसाई हे नवखे उमेदवार आहेत.
भादवण येथे सर्वांत जास्त मतदार असल्याने दोन्ही आघाड्यांनी येथून उमेदवाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. निंगुडगे-सरोळी येथेही उमेदवार आहेतच. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीने ५४६ मतदारसंख्या असलेले गजरगाव रिकामे ठेवले आहे.
राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रस, शिंपी गट, शिवसेना, स्वाभिमानी संघटना, अशोकअण्णा गट या सर्वांचेच उमेदवार या गटात आहेत. गत निवडणुकीत अंजनातार्इंना या गटातून मोठे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र मोठी मतदारसंख्या असलेल्या प्रत्येक गावातून विरोधी आघाडीने उमेदवार दिल्याने मताधिक्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा महिला गटातून स्व. देसाई आघाडीने सुनीता रेडेकर यांना उमेदवारी देऊन, तर भटक्या-विमुक्त गटातून राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसने विकास बागडी यांचे नाव पुढे करून संभाव्य धोका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Shiv Sena's reputation is with the grand-aged former directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.