शिवसेनेची शहरातून भगवी रॅली, मोटरसायकलवरुन बंदचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:18 PM2020-12-08T15:18:20+5:302020-12-08T15:20:50+5:30

BharatBand, FarmarStrike, ShivSena, Kolhapurnews केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधयेकाविरोधात मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. शिवसेनेच्यावतीने या आंदोलनाला पाठींब देत शहरातून भगवी रॅली काढली.

Shiv Sena's saffron rally from the city, call for bandh on motorcycles | शिवसेनेची शहरातून भगवी रॅली, मोटरसायकलवरुन बंदचे आवाहन

कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेर्तुत्वाखाली भारत बंदला पाठींब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली.

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेची शहरातून भगवी रॅली, मोटरसायकलवरुन बंदचे आवाहन जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा

कोल्हापूर : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधयेकाविरोधात मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. शिवसेनेच्यावतीने या आंदोलनाला पाठींब देत शहरातून भगवी रॅली काढली. मोटरसायकलवरुन शिवसैनिकांनी सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकराचा निषेध करत जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा करण्यात आल्या.

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसैनिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आदेश दिले होते. यानुसार कोल्हापुरातील शिवसैनेच्यावतीने सकाळी शहरातून मोटरसायकल रॅलीकडून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी हतात भगवे झ्रेंडे, भगव्या टोप्या, गळ्यात मफलर घातले होते.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी मंडप येथून दुचाकी रॅलीला सुरवात झाली. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिख पूल, राजरामपुरी, उमा टॉकीज मार्गी रॅली बिंदू चौक़ येथे येवून सांगता झाली. यावेळी सुजित चव्हाण, अवधुत साळोखे, हर्षल सुर्वे, विनायक साळोखे, विराज पाटील, विनोद खोत, दिनेश परमार, मंजित माने, रणजित आयरेकर, धनाजी यादव, दिलीप जाधव, संजय जाधव आदी उपस्थित होते.


\\

Web Title: Shiv Sena's saffron rally from the city, call for bandh on motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.