वल्लभगडावर आढळले शिवकालीन भुयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:18+5:302021-02-25T04:30:18+5:30
संकेश्वर : शिवकालीन इतिहास लाभलेल्या वल्लभगडावर जाण्यासाठी नवीन रस्त्याच्या कामावेळी शिवकालीन भुयार आढळले. समुद्रसपाटीपासून १८५० फूट उंच असणाऱ्या ...
संकेश्वर : शिवकालीन इतिहास लाभलेल्या वल्लभगडावर जाण्यासाठी नवीन रस्त्याच्या कामावेळी शिवकालीन भुयार आढळले. समुद्रसपाटीपासून १८५० फूट उंच असणाऱ्या वल्लभगडावर हे भुयार जांभ्या (चिरे) दगडांत कोरले असून ३० फूट लांब व साडेतीन फूट उंच आहे. सुधीर शेलार, राहुल डावरे व दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या भुयाराची आत जाऊन साफसफाई केली.
रस्त्याचे काम सुरू असताना जे.सी.बी.ला भुयार आढळून आले. शिवकाळात शत्रूला चकवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असावा. इ.स. १६७६ मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम राबविली. हा भाग नियंत्रणात राहावा म्हणून गोव्यातील पोर्तुगीज, जंजिराच्या शत्रूवर नियंत्रण ठेवण्यास या गडाचा उपयोग करण्यात येत होता.
----------------------------
* फोटो ओळी :
वल्लभगड (ता. हुक्केरी) येथे गडावर जाण्यासाठी रस्ता करत असताना सापडलेला शिवकालीन भुयारी मार्ग.
क्रमांक : २४०२२०२१-गड-०५