Shivjayanti Kolhapur : मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 06:30 PM2021-05-13T18:30:10+5:302021-05-13T18:33:50+5:30
Shivjayanti Kolhapur : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पारंपारिक पद्धतीने येणाऱ्या शिवजयंती उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी गुरुवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात संयुक्त जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळ , संयुक्त रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ,शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.
कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गामुळे पारंपारिक पद्धतीने येणाऱ्या शिवजयंती उत्सवावर निर्बंध आले. त्यामुळे शहरातील बहुतांशी मंडळांनी गुरुवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यात संयुक्त जुना बुधवार पेठ, मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळ , संयुक्त रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ,शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.
मंगळवार पेठ, राजर्षि शाहू तरुण मंडळ
मंगळवार पेठेतील राजर्षि शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे शासकीय नियम पाळून सुशिला देसाई, लता डवरी, वासंती घोरपडे, दीपाली धनवडे, शिल्पा सरवदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर पाळणा म्हणण्यात आला. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बाबुराव चव्हाण, आनंदराव पायमल, अशोक पोवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, बापू आवळे, बाबा पाटेर्, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.
शिवाजी पेठ, नेताजी तरुण मंडळ
शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाच्यावतीने पारंपारीक शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्या हस्ते शिव प्रतिमा पूजन झाले. यावेळी मंडलाचे अध्यक्ष राजू साळोखे, लालासाहेब गायकवाड, शिवाजीराव पोवार, जयवंतराव साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, रविंद्र राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था
जुना बुधवार पेठेतील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवप्रार्थना प्रेरणास्त्रोत पठण करण्यात आले यासोबतच शिवशस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. यानिमित्त परिसरातील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत, सचिव सुशिल भांदीगरे, संजय पाटील, उदय भोसले, नागेश घोरपडे, अनिल निकम, मकरंद स्वामी, राजू कुंडले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संदीप देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तरेश्वर पेठेतील संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती सोहळा समितीतर्फे गुरुवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे सुनील कांबळे, तुलसीदास कांबळे, विलास कांबळे, राजेंद्र कांबळे, (सर्व स्मशानभूमीतील कर्मचारी) यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्वांचा उत्तरेश्वर पेठेतर्फे कोरोना योद्दा म्हणून शाल श्रीफ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे किशोर घाडगे, भाऊ घोडके, दीपक काटकर, विराज चिखलीकर, सुरेश कदम, विनायक साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समिती
संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे बिंदु चौकात शिवजयंतीनिमित्त महापालिका कर्मचारी प्रिती चंदुगडे, पूजा भोर, सेजल मोरे यांच्या हस्ते पुतळा व पाळणा पुजन झाले. यावेळी जयेश कदम, जयेश ओसवाल, सचिन तोडकर, आप्पा लाड, प्रविण सोनवणे, संजय कदम, महेश ढवळे, बाळासाहेब मुधोळकर, सुधीर खराडे, अजित गायकवाड,वनिता ढवळे, पूजा शिराळकर, धनश्री तोडकर आदी उपस्थित होते.
छत्रपती शहाजी तरुण मंडळ
छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शहाजी तरुण मंडळातर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहर वाहतुक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते गुरुवारी पाळणा पुजन झाले. यावेळी आर.के,पोवार, ईश्वर परमार, आदील फरास, उदय शिंदे, सागर शिंदे, संजय केसरकर, शिवाजी यादव, हेमंत मेंहदळे आदी उपस्थित होते.
हिंदु एकता
हिंदु एकता संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पु्ष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर वाहतुक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आण्णा पोतदार, बापू वडगावकर, गजानन तोडकर, सुरेश काकडे, हिंदुराव शेळके, सुरजित गायकवाड, विलास मोहीते, दिलीप सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.