शिवाजी चौकात दिव्यांगांचा साखर-पेढे वाटून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:57+5:302021-09-05T04:27:57+5:30
कोल्हापूर : टोकिओ पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने १२ पदके पटकावली. या अभूतपूर्व यशाबद्दल क्रांती हॅण्डीकॅप्ड मल्टीपर्पज फाऊंडेशन, कोल्हापूर दिव्यांग ...
कोल्हापूर : टोकिओ पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाने १२ पदके पटकावली. या अभूतपूर्व यशाबद्दल क्रांती हॅण्डीकॅप्ड मल्टीपर्पज फाऊंडेशन, कोल्हापूर दिव्यांग सेना व कोल्हापूर डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन फाॅर डिसेबल्ड या संस्थेच्यावतीने शनिवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय संघाने टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर भारतीय पॅरा संघानेही त्यांचा कित्ता गिरवत अभूतपूर्व यश मिळवले. यात ५४ दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात सुमित अन्तील, प्रवीण कुमार, योगेश कथनिया, श्रामपाल, अवनी लेखरा, निशादकुमार, सिंगराज अधानान, मनीष नरवाल, मरिअप्पन, भाविनाबेन पटेल, देवेंद्र झांजरिया, शरदकुमार, सुंदरसिंग गुलजार यांनी यश मिळवले. त्यात विविध खेळ प्रकारांत दोन सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्य अशा बारा पदकांची लयलूट केली. याबद्दल कोल्हापुरातील विविध दिव्यांग संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी चौकात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नारायण मडके, संजय आडके, अतुल धनवडे, सुधाकर भोसले, कृष्णात पेडेकर, केरळी, मंजुषा आडके, उत्तम चौगुले, प्रशांत निगडे, तुकाराम हारुगडे, सुनीता तलवार, धनाजी पाटील, रुपेश दरवान, विनायक चौगले, विद्या सुतार, सुरेखा साखरे, विनायक पोवार, अरुण लोखंडे आदी उपस्थित होते.