'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 01:10 PM2019-09-20T13:10:24+5:302019-09-20T13:12:08+5:30

भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे.

Shivaji Maharaj inspires soldiers in war: Lt Gen Pannu | 'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'

'छत्रपती शिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना मिळते प्रेरणा, तेच आमच्या रेजिमेंटचे आदर्श!'

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांमुळे युद्धात जवानांना प्रेरणा  : लेफ्ट जनरल पन्नूमराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन

बेळगाव  छत्रपती शिवाजी महाराजांपासून जवानांना ऊर्जा प्रेरणा मिळते त्यामुळेच जवान सीमेवरील शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज असतात. शिवाजी महाराज आमच्या रेजिमेंटचे आदर्श आहेत. भारतीय सैन्याला नामोहरम करेल असा शत्रू अजून निर्माण व्हायचा आहे. शत्रू लढाईसाठी आव्हान देईल याची आम्ही प्रतीक्षा करत असतो असे मत कर्नल ऑफ रेजिमेंट लेफ्टनंट जनरल पी. जे. एस .पन्नू यांनी काढले.

मराठा सेंटर मधील मराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या मुजियमचे उदघाटन लेफ्टनंट जनरल पी जे एस पंन्नू यांनी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी  हे मत मांडले. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे, ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर उपस्थित होते.

तत्पूर्वी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 492 जवानांचा दीक्षांत आणि शपथविधी कार्यक्रम तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पी.जे.एस.पन्नू उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी तिरंगा आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली.नंतर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली.



नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेला सिद्ध झालेल्या जवानांचे मी अभिनंदन करतो.त्यांच्या पालकांनी देखील त्यांना सैन्यात दाखल केल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण अत्त्युत्तम आहे. या प्रशिक्षणाचा तुम्हाला मातृभूमीच्या रक्षणासाठी उपयोग होणार आहे.मराठा इन्फंट्रीला गौरवपूर्ण इतिहास आहे.या परंपरेची जबाबदारी तुमच्यावर आहे असेही पन्नू म्हणाले.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेन्टरच्या वस्तू संग्रहालयाचे उदघाटन पन्नू यांच्या हस्ते करण्यात आले. वस्तूसंग्रहालयाची माहिती मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.नंतर जवानांच्या स्मारकाला भेट देऊन अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिले.

प्रशिक्षण कालावधीत बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरी बद्दल जवान बाळू सिद्धप्पा धनगर, कल्लप्पा शंकर तोनपे , कल्लप्पा देवप्पा लोंढे, परशुराम, रामदास शिवाजी पाटिल, भरत शाहपुरकर याना पन्नू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे,लष्करी अधिकारी, जवान आणि जवानांचे नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Shivaji Maharaj inspires soldiers in war: Lt Gen Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.