शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च
By संदीप आडनाईक | Published: February 18, 2023 09:36 AM2023-02-18T09:36:49+5:302023-02-18T09:37:12+5:30
कोल्हापुरातील पुरालेखागारात दस्तावेज उपलब्ध
संदीप आडनाईक
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्यांनी बांधलेल्याच नव्हे तर स्वराज्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला, यातच त्यांचे द्रष्टेपण दिसते. त्यांनी डागडुजीसाठी स्वराज्यातील सुमारे २० किल्ल्यांसाठी १ लाख ७५ हजार होन मंजूर
केल्याचा अस्सल कागद कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाकडे उपलब्ध झाला आहे.
असा आहे मजकूर : ‘इ. स. १६७१ आणि १६७२ मधील एका मोडी कागदपत्रानुसार महाराजांनी १ लाख ७५ हजार होन खर्च केल्याची नोंद आढळली आहे. या कागदावर वरच्या बाजूला राजमुद्रा असून, शेवटी दस्तुर राजश्री पंत म्हणून संग्रह केला, असा उल्लेख आहे. राजवाडे यांच्या आठव्या खंडातील २२ व्या पानावर याची प्रथम प्रसिद्धी झाली आहेे. कोल्हापूर पुरालेखागारातील पंत अमात्य बावडा दफ्तरात याचा उल्लेख आहे.
रायगडासाठी सर्वाधिक खर्च
रायगडासाठी ५० हजार होन खर्च केले आहेत. त्यात ३५०० होन घरे, २० हजार तळी, १० हजार गच्ची, ५ हजार केले आणि तटासाठी १५००० असा ५० हजार खर्चाची नोंद आहे.