शिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी : भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:35 PM2020-07-17T17:35:10+5:302020-07-17T17:38:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून, त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Shivaji Maharaj's history is still inspiring today: Bhagat Singh Koshyari | शिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी : भगतसिंह कोश्यारी

शिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी : भगतसिंह कोश्यारी

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी : भगतसिंह कोश्यारी प्रेरणा नेतृत्वगुण विकास शिबिराचा समारोप

कोल्हापूर  : छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून, त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणा-२०२० या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास प्रशिक्षण शिबिराच्या ऑनलाईन समारोपात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.

आज शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य हीच आजच्या तरुणांसाठी प्रचंड मोठी प्रेरणाशक्ती आहे. महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण वाटचाल करण्याचा निर्धार करावा. या शिबिरात पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या मान्यवरांचा आदर्श ठेवून आपण देशकार्य करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यांच्याप्रमाणे चांगल्या कामासाठीचे पुरस्कार आपल्यालाही मिळायला हवेत, अशी जिद्द ठेवून काम करीत राहायला हवे. आत्मविश्वािस, संयम आणि स्वयंशिस्तीच्या बळावर ही गोष्ट साध्य करण्यात काहीच अडचण येणार नसल्याचे कुलपती कोश्यारी यांनी सांगितले.

युवकांमध्ये प्रेरणा ही महापुरुषांच्या चरित्रांतून, व्यक्तिमत्त्वांतून येते. युवा जीवनात अशा आदर्श व्यक्तींना मानाचे स्थान असते. या प्रेरणा शिबिरांतर्गत डॉ. अभय बंग, पोपटराव पवार, डॉ. प्रकाश आमटे, इंद्रजित देशमुख, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. भास्कर पेरे-पाटील, सयाजी शिंदे, डॉ. अविनाश पोळ, आदी मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन संवाद घडविण्यात आला. हे पिढी घडविण्याचेच काम आपण करीत आहोत. विद्यार्थ्यांनीही हे विचार संचित आयुष्यभर जपावे, असे आवाहन डॉ. करमळकर यांनी केले.

व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी शिबिराचा आढावा सादर केला. प्रा. ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले.

व्यक्तीमत्त्व विकासाची संधी

कोरोना महामारीच्या काळात शिवाजी विद्यापीठाने राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबिर आयोजित करून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्त्व विकासाची संधी उपलब्ध करून दिली, ही अभिमानास्पद बाब असल्याचे कुलपती कोश्यारी यांनी सांगितले

 

Web Title: Shivaji Maharaj's history is still inspiring today: Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.