गांधी मैदानाच्या स्वच्छतेसाठी सरसावली शिवाजी पेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:46 AM2020-02-10T11:46:08+5:302020-02-10T11:49:16+5:30

शिवसेना शहर शाखा आणि महापालिकेच्यावतीने शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान परिसराची रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालचमूसह पेठेतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १ डंपर कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम घेण्यात आली. ​​​​​​​

Shivaji Peth, Sarasavali for cleaning Gandhi Maidan | गांधी मैदानाच्या स्वच्छतेसाठी सरसावली शिवाजी पेठ

गांधी मैदान येथे स्वच्छता मोहिमेवेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी रविकिरण इंगवले यांच्यासह शिवाजी पेठेतील नागरिक उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देबालचमूसह, फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंचा सहभाग मैदान स्वच्छ ठेवण्याची घेतली शपथ

कोल्हापूर : शिवसेना शहर शाखा आणि महापालिकेच्यावतीने शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान परिसराची रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बालचमूसह पेठेतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या असा १ डंपर कचरा उठाव करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम घेण्यात आली.

शिवाजी पेठेतील सर्व नागरिक, क्रिकेट, फुटबॉलचे खेळाडू, महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी, वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था यांनी मैदान परिसराची स्वच्छता केली. सकाळी ७ वाजता मोहिमेला सुरुवात झाली.

यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी लहान मुले, खेळाडू व भागातील नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आबाजी जगदाळे, नंदकुमार तिवले, बबलू चव्हाण, राहुल तिवले, विकास जाधव, राकेश माने, तात्या साळोखे, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: Shivaji Peth, Sarasavali for cleaning Gandhi Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.