शिवाजी पेठेचा अंदाज लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:36 AM2019-04-11T00:36:42+5:302019-04-11T00:36:48+5:30

भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुरोगामी, स्वाभिमानी आणि एकदा दिलेला शब्द पडू द्यायचा नाही, असा बाणा ...

Shivaji Pethh | शिवाजी पेठेचा अंदाज लागेना

शिवाजी पेठेचा अंदाज लागेना

Next

भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरोगामी, स्वाभिमानी आणि एकदा दिलेला शब्द पडू द्यायचा नाही, असा बाणा असलेल्या शिवाजी पेठेतील मतदार यंदा लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने मते टाकतात, हा मोठा औत्सुक्याचा विषय आहे. एरवी कोणत्याही विषयावर केवळ पेठ म्हणून एकत्र येणारे कार्यकर्ते, दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेते या निवडणुकीत राजकीय पक्ष आणि गटातटांत विखुरले गेले आहेत. मतदानाचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे, तशी येथील राजकीय हवाही तापू लागली असली तरी अमुक एक उमेदवार हमखास एवढी मते घेईल, याचा अंदाज बांधणे आजच्या घडीला कठीण आहे.
शिवाजी पेठेचा परिसर तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, आयरेकर गल्ली, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका, टिंबर मार्केटची कमान, लाड चौक, खरी कॉर्नर ते निवृत्ती चौक अशा परिघात व्यापलेला आहे. पूर्वापार पुरोगामी चेहरा, स्वाभिमानी वृत्ती आणि शब्दाला जागणारी प्रवृत्ती असा शिवाजी पेठेचा नावलौकिक आहे. आतापर्यंत झालेल्या असंख्य सामाजिक, राजकीय आंदोलनांत पेठेतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आंदोलनांतून पेठेत कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली.
एकेकाळचा शेतकरी कामगार पक्षाचा मजबूत गड अशी ओळख असलेल्या पेठेतील मतदारांनी पुढच्या काळात कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला स्वीकारले. याच पेठेत डाव्या पक्षापैकी भाकप, माकप तसेच जनता दल यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आदेश मानत इमानेइतबारे कॉँग्रेस - राष्टÑवादीची पाठराखण केली. माजी आमदार सुरेश साळोखे, कै. रामभाऊ चव्हाण यांच्यामुळे शिवसेना पेठेत पोहोचली. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद कमी झाली आणि तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला. सेनेने बºयापैकी बस्तान बसविले.
शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वडील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक उमेदीच्या काळात काही वर्षे पेठेतील सरदार तालीम परिसरात राहायला होते. पेठेतील तत्कालीन पिढीतील मतदारांनी त्यांचा सतत आदर केला; परंतु पुढील काळात संजय मंडलिक यांना हे नाते टिकविता आले नाही. कार्यक्रमाच्या निमित्तानेच त्यांचे येणे होत राहिले. याउलट महादेवराव महाडिक यांच्याबद्दल एक वेगळा करिष्मा निर्माण झाला तो महापालिका राजकारणामुळे! भिकशेठ पाटील, प्रल्हाद चव्हाण, दिलीप मगदूम, बाजीराव चव्हाण, सई खराडे यांना महापौरपदी; तर विक्रम जरग यांना उपमहापौरपदी बसविल्यामुळे महाडिक यांना मानणारा एक वर्ग तयार झाला. राष्टÑवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी पुढील काळात स्वत:चे वलय तयार केले. युवा कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले. प्रमुख कार्यकर्त्यांनी भूमिका घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.
प्रल्हाद चव्हाण कुटुंबात दोन गट पडले आहेत. सागर व सचिन ही दोन्ही मुले मंडलिक यांच्या बाजूने ; तर स्वत: प्रल्हाद चव्हाण महाडिक यांच्या प्रचारात आहेत. अ‍ॅड. अशोकराव साळोखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असूनही प्रचारात दिसत नाहीत. त्यांनी मंडलिक कुटुंबाशी असलेल्या संबंधांना प्राधान्य दिले असल्याचे सांगण्यात येते. चंद्रकांत यादव, सुभाष सावंत हे डाव्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षादेश मानून कार्यरत आहेत. पेठेतील सई खराडे, भिकशेट पाटील प्रचारात दिसत नाहीत. कै. श्रीपतराव बोंद्रे यांच्या घराण्यातील नव्या पिढीतील माजी महापौर शोभा बोंद्रे, इंद्रजित बोंद्रे यांनी मंडलिकांचे ‘धनुष्य’ हाती घेतले आहे.

महाडिक यांच्या बाजूचे कार्यकर्ते
प्रल्हाद चव्हाण, बाजीराव चव्हाण, सुभाषराव कोराणे, अजित राऊत, उत्तम कोराणे, महेश सावंत, अशोक जाधव-मालक, चंद्रकांत यादव, बाळासाहेब सासने, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, गजानन जरग, परीक्षित पन्हाळकर, नितीन हारुगले, अतुल साळोखे, भानुदास इंगवले, प्रताप देसाई, राजू सावंत, संजय कुराडे, संजय पडवळे, सुहास साळोखे, सुनील बाळासो जाधव.

मंडलिक यांच्या बाजूचे कार्यकर्ते
महेश जाधव, सुजित चव्हाण, सुरेश साळोखे, शोभा बोंद्रे, इंद्रजित बोंद्रे, विक्रम जरग, सुरेश जरग, रविकिरण इंगवले, अशोकराव साळोखे, तुकाराम साळोखे, प्रकाश सरनाईक, विवेक पोवार, मोहनराव साळोखे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण.

Web Title: Shivaji Pethh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.