शिवाजीराजे पतसंस्थेवरील विश्वास कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:33+5:302021-03-13T04:43:33+5:30

पेठवडगाव : कोरोनाच्या कालावधीत व्यवहार ठप्प असतानादेखील चांगल्या पध्दतीने काम केल्यामुळे संस्थेत ठेवीत १ कोटी ४० लाखांची वाढ ...

Shivaji Raje maintained faith in Patsanstha | शिवाजीराजे पतसंस्थेवरील विश्वास कायम

शिवाजीराजे पतसंस्थेवरील विश्वास कायम

Next

पेठवडगाव : कोरोनाच्या कालावधीत व्यवहार ठप्प असतानादेखील चांगल्या पध्दतीने काम केल्यामुळे संस्थेत ठेवीत १ कोटी ४० लाखांची वाढ झाली. यावरून संस्थेवरचा विश्‍वास कायम राहिला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात यांनी केले.

येथील शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपाध्यक्ष संजय कदम, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, बाळासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

नगराध्यक्ष माेहनलाल माळी म्हणाले, आर्थिक मंदी, बाजारपेठेतील मरगळ, बँकांशी असणारी स्पर्धा व कोरोना महामारी अशा अडचणीच्या स्थितीतदेखील संस्थेने चांगली प्रगती केली.

संस्थेच्यावतीने कोरोनाकाळात चांगले काम केलेले व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विषय वाचन सेक्रेटरी रामचंद्र जंगम यांनी केले. संतोष नांगरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आर. ए. पाटील, देवेंद्र राणे, सतीश ताटे, अभिताभ सणगर, खलील कवठेकर, शरद गुरव, कालिदास धनवडे, शरद पाटील, सुनीता पोळ, सावित्री घोटणे आदी उपस्थित होते.

११ वडगाव शिवाजीराजे

फोटो - पेठवडगाव शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष अजय थोरात, व्यासपीठावर नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, संजय कदम, संतोष चव्हाण, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

------------------------

Web Title: Shivaji Raje maintained faith in Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.