भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी सम्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:46+5:302021-09-16T04:30:46+5:30
जी. व्ही. राजदीप यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले, ...
जी. व्ही. राजदीप यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले, बैठकीत ए. के कांबळे, बी. डी. कांबळे, विजय कांबळे, शिवाजी सम्राट, सागर कांबळे, प्रतिभा कांबळे, सुनील कामत, ईश्वर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक व्यक्ती सुसंस्कारित होण्यासाठी बौद्ध संस्कार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारतीय बौद्ध महासभा ही संस्कार करणारी आदर्श संस्था आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण बौद्ध समाजाने एकत्र राहिल्यास प्रगती होईल. अन्यथा विरोधी विचार प्रवाह समाजात निर्माण होऊन समाजाचे नुकसान होणार आहे. त्यासाठी समाजाने जागृत होणे गरजेचे आहे, असे सर्वांनी आपल्या मनोगतात सांगितले. बैठकीत आजरा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी सम्राट यांची निवड करण्यात आली. संदीप कांबळे-सरचिटणीस, नेताजी कांबळे-कोषाध्यक्ष या निवडी करण्यात आल्या. सुनील कामत यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी सम्राट यांनी आभार मानले.
शिवाजी सम्राट : १५०९२०२१-गड-०१