शिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्या, क्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:21 PM2019-03-13T12:21:39+5:302019-03-13T12:29:11+5:30

छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था थांबविण्याबाबत १५ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आश्वासन कोल्हापुरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना दिले होते; पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मंगळवारी पुन्हा क्रीडाप्रेमींच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले व लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी विनंती केली.

Shivaji Stadium: Take a meeting about disturbed, demand for sportspersons: Appeal to the district collectors | शिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्या, क्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

शिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्या, क्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

Next
ठळक मुद्देशिवाजी स्टेडियम दुरवस्थेबाबत बैठक घ्याक्रीडाप्रेमींची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था थांबविण्याबाबत १५ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आश्वासन कोल्हापुरातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना दिले होते; पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मंगळवारी पुन्हा क्रीडाप्रेमींच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले व लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी विनंती केली.

छत्रपती शिवाजी स्टेडियम हे खासगी कार्यक्रमांना दिल्याने स्टेडियमची दुरवस्था वाढत होती. त्याबाबत क्रीडाप्रेमींतून संतापाची लाट उमटली होती; त्यामुळे हे स्टेडियम क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी क्रीडाप्रेमी व खेळाडूंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी भेट घेऊन समस्या मांडल्या.

त्यावेळी १५ दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते; पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मंगळवारी पुन्हा क्रीडाप्रेमींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने बैठक घेण्याची विनंती केली. यामध्ये अशोक पोवार, रमेश मोरे, आदींचा समावेश होता.
 

 

Web Title: Shivaji Stadium: Take a meeting about disturbed, demand for sportspersons: Appeal to the district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.