शिवाजी विद्यापीठाकडून २९४ परीक्षांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:56+5:302021-06-11T04:17:56+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर विविध अभ्यासक्रमांच्या एकूण २९४ परीक्षांचे निकाल गुरूवारपर्यंत जाहीर झाले. परीक्षा व ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर विविध अभ्यासक्रमांच्या एकूण २९४ परीक्षांचे निकाल गुरूवारपर्यंत जाहीर झाले.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाने बी. ए. मल्टीमीडिया सत्र (तीन, पाच, सहा), एमबीए रेग्युलर सत्र (एक, दोन), बी. डेस. सत्र (तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ), बी. व्होक. रिटेल मॅॅनेजमेंट अँड आयटी सत्र (पाच), ॲप्लाईड केमिस्ट्री सत्र (दोन) या परीक्षांचे निकाल गुरूवारी ऑनलाईन जाहीर केले. एम. ए., एम. लिब., एम. कॉम., मास्टर ऑफ व्हॅॅल्यूएशन, एमसीए., एम. एस्सी. (नॅॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी), एम. ए., एम. एस्सी., एम. एस्सी., बीएस्सी., बी. ए. या अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी ११,१८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०,६०९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.