शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:15 AM2019-09-22T00:15:44+5:302019-09-22T00:18:51+5:30
राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे ‘शिवाजी’ हे राज्यातील पहिलेच ठरले आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या मानांकनाचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशात शनिवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यापीठाच्या सर्वंकष पाहणी करून ‘आयएसओ ९००१ : २०१५’ हे मानांकन मिळाले. हे मानांकन मिळणारे ‘शिवाजी’ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे.
राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे ‘शिवाजी’ हे राज्यातील पहिलेच ठरले आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या मानांकनाचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (आयएसओ) या संस्थेकडून हे मानांकन प्रमाणपत्र दिले जाते.
विद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ. आर. के. कामत म्हणाले, ‘आयएसओ’ ही संस्था जगभरातील विविध वस्तू, सेवा आणि संस्था यांच्याशी निगडित गुणवत्तेचे, दर्जाचे मूल्यांकन करणारी आघाडीची आणि अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे.
परिणामकारकता, कार्यक्षमता आणि कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता अशा विविध निकषांवर गुणवत्तेचे निर्धारण या संस्थेकडून करण्यात येते. जगात आणि देशात ‘आयएसओ’ सर्टिफिकेशन करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तथापि, गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही असणाºया जर्मनीच्या ट्यू सूद या कंपनीकडून तपासणी करवून घेण्यास शिवाजी विद्यापीठाने प्राधान्य दिले, हे यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ‘आयएसओ’सारख्या मानांकनामुळे एक टप्पा गाठला आहे. पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी संबंधित घटकांवर आहे. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील ट्यू सूद साऊथ एशिया कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, अनिल साळवी, सुजित पाटील उपस्थित होते.
अंतर्गत आॅडिटर
सध्याचे प्रमाणपत्र हे ९ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे आहे. मात्र, ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणारी नसून या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे ३७ तज्ज्ञ अंतर्गत तपासनिसांची (अंतर्गत आॅडिटर) फळी निर्माण केली आहे.
का मिळाले मानांकन
सातत्यपूर्ण प्रगती करणारा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणारे विद्यापीठ (तुरुंगातील कैद्यांसाठी अभ्यासक्रम)
वेळेत निकाल लावण्याची परंपरा
दुर्मिळ हस्तलिखिते असणारे सुसज्ज गं्रथालय
वि.स.खांडेकर संग्रहालयाचे वेगळेपण
साडेतीन हजार शिक्षकांना प्रशिक्षित करणारे सायबर सिक्युरिटी केंद्र