शिवाजी विद्यापीठ नावाचा विषय ६० वर्षापूर्वी निकाली : प्रा. एन. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:26 PM2019-12-11T14:26:17+5:302019-12-11T14:28:20+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा विषय ६० वर्षापूर्वीच निकाली निघाला आहे. त्याचा आता नामविस्तार झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच नजरेआड होईल, अशी चिंता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला आपल्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमींचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने नामविस्ताराला विरोध करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा विषय ६० वर्षापूर्वीच निकाली निघाला आहे. त्याचा आता नामविस्तार झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच नजरेआड होईल, अशी चिंता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. विद्यापीठाच्या नामविस्ताराला आपल्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमींचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने नामविस्ताराला विरोध करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.
प्रा. पाटील म्हणाले, ‘स्थापनेवेळीच विद्यापीठाच्या नावासाठी नेमलेली चिकित्सा समिती व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यात चर्चा होऊनच हे नाव निश्चित करण्यात आले होते; परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून तो ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावा, अशी सूचना राज्यपालांना केली आहे. शिवाजी महाराजांचे नाव आदरयुक्त असावे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे; परंतु नामविस्तार झाल्यास शिवाजी महाराजांचे नावच गायब होईल; त्यामुळे या नामविस्तारास आमचा विरोध आहे.
शिष्टमंडळात डॉ. जयसिंगराव पवार, वसंत मुळीक, प्राचार्य टी. एस. पाटील, दिलीप पवार, सुभाष वाणी, अॅड. गुलाबराव घोरपडे, डॉ. डी. आर. मोरे, बाबा सावंत, उदय धारवाडे, प्रा. किसन कुराडे, गणी आजरेकर, कादर मलबारी, रमेश मोरे, रमेश पोवार, अशोक पोवार, अशोक भंडारे, बाबूराव कांबळे, बबन रानगे, महादेव पाटील, अवधूत पाटील, प्रा. मधुकर पाटील, युवराज कदम, प्रभाकर पाटील, डॉ. लखन भोगम, रवी जाधव, आदींचा समावेश होता.