शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवत्ता शिष्यवृत्तीतील महाविद्यालयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:17 PM2019-09-09T14:17:18+5:302019-09-09T14:18:54+5:30
शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमधील गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमधील गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.
कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र, सामाजिकशास्त्र विद्याशाखानिहाय सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या शहरी, निमशहरी व ग्रामीण या गटांतून सर्वप्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गौरविण्यात आलेली महाविद्यालये (विजेत्या महाविद्यालयांची नावे अनुक्रमे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण गट अशी) : कला विद्याशाखा : छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. यशवंतराव चव्हाण आर्टस-कॉमर्स कॉलेज, उरूण इस्लामपूर. श्रीपतराव चौगुले आर्टस अँण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली, कोल्हापूर. वाणिज्य : डी. डी. शिंदे सरकार कॉलेज. श्री. व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी. श्री. शिव-शाहू महाविद्यालय, सरूड. विज्ञान : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज. दूधसाखर महाविद्यालय, बिद्री. अभियांत्रिकी : तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर. विधी विद्याशाखा : शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. शिक्षणशास्त्र : संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव. सामाजिकशास्त्रे : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क , जकातवाडी, सातारा. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे, आदी उपस्थित होते. अभिजित लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश ढोणुक्षे यांनी आभार मानले.
४६७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील एकूण ४६७ विद्यार्थ्यांना ३० लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.