शिवाजी विद्यापीठात ‘पीओएस’ ची संख्या वाढविणार; सुविधा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:45 PM2018-07-31T15:45:15+5:302018-07-31T15:49:47+5:30
विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले.
कोल्हापूर : विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले.
कॅशलेस व्यवहारासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसारआॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा विद्यापीठ प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवड्याभरापूर्वी एक दिवस या सुविधेत अडचण निर्माण झाली.
संबंधित अडचण दूर झाल्याने कॅशलेस सुविधा पूर्ववत आणि सुरळीतपणे उपलब्ध झाली आहे. विविध शुल्क भरण्यासाठी विद्यापीठामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून पीओएस मशीन वाढविण्यात येणार आहेत.