शिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:41 PM2018-07-16T17:41:56+5:302018-07-16T17:47:17+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली.

Shivaji University: Meeting of the Block Management Council by the student council | शिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठक

शिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठक

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेने रोखली व्यवस्थापन परिषदेची बैठकअहवाल तीन महिन्यात, कुलसचिवांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात सुरु असलेली व्यवस्थापन परिषदेची बैठक काहीकाळ रोखून धरली. याबाबत समिती नेमून तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.



शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दिक्षांत समारंभाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाई गोंधळाबाबत अभाविपने कुलगुरु आणि प्रकुलगुरुंना मार्च महिन्यात प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली, पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारले, याबाबत विद्यार्थी परिषदेने लेखी आश्वासन मिळावे या मागणीसाठी सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंदोलन केले.

कार्यकर्त्यांनी बैठकीसमोरील जागेत जवळपास दोन तास ठिय्या मारुन या बैठकीत घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरु आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना निवेदन देउन लेखी आश्वासन देण्याचा आग्रह धरला. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती.

या बैठकीत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परिक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. महेश काकडे, प्रकुलगुरु डॉ. शिर्के यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी कुलगुरुंच्या आदेशान्वये व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येईल, समितीच्या बैठका त्वरित आयोजित करुन तीन महिन्यात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री साधना वैराळे, जिल्हा संयोजन श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार मगदूम (इचलकरंजी) तसेच गणेश जाधव, दिपांजली पिसे (सांगली) यांनी केले.

Web Title: Shivaji University: Meeting of the Block Management Council by the student council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.