शिवाजी विद्यापीठाने दिले ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:49 PM2019-09-26T17:49:38+5:302019-09-26T17:52:31+5:30

विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले.

Shivaji University offers 'wherever, it will see skills training' | शिवाजी विद्यापीठाने दिले ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’

शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. त्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ए. एम. गुरव, गजानन राशिनकर, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाने दिले ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’उद्योजकता विकास केंद्राचा नावीन्यपर्ण उपक्रम; १५ प्रशिक्षकांचा सहभाग

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना विविध स्वरूपांतील कौशल्ये मिळावीत. त्यांच्यामध्ये कौशल्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला.

विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले.

मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील या उपक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. डॉ. शिर्के म्हणाले, ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा अत्यंत अभिनव स्वरूपाचा उपक्रम आहे.

या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रशिक्षकांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अधिसभा सदस्य पंकज मेहता, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, के. व्ही. मारुलकर, के. बी. पाटील, गजानन राशिनकर, एम. व्ही. चव्हाण, शिवप्रसाद शेटे, विजयकुमार मुत्नाळे, विजय तिवारी, शिवप्रसाद बेकनाळकर, श्री. लिटॉन, आदी उपस्थित होते.

 शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

 

Web Title: Shivaji University offers 'wherever, it will see skills training'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.