शिवाजी विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला 'हा' निर्णय
By संताजी मिठारी | Published: August 11, 2022 03:53 PM2022-08-11T15:53:15+5:302022-08-11T15:53:54+5:30
पूरपरिस्थितीमुळे काल, बुधवारी शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या होत्या
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे काल, बुधवारी शिवाजी विद्यापीठानेपरीक्षा स्थगित केल्या होत्या. पुढील परीक्षांबाबतचा आज, गुरूवारी निर्णय घेण्यात येणार होता. याबाबत निर्णय झाला असून परीक्षा पुन्हा लांबणीवर पडणार आहेत.
पूर परिस्थिती अद्याप पूर्ववत झालेली नसल्याने शिवाजी विद्यापीठाने आणखी दोन दिवस म्हणजे (दि.१२ व १३ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्यामुळे विविध ६१ अभ्यासक्रमांच्या ४१ हजार ५४२ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडली आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या-नाल्याचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास आणि जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्या आहेत. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाणार आहे.