शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी. एस. पाटील जागतिक शास्त्रज्ञांमध्ये अव्वलस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:33 AM2021-05-29T11:33:24+5:302021-05-29T11:35:11+5:30
Shivaji University Kolhapur : एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.
कोल्हापूर : एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये अव्वलस्थान मिळाले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत टॉप टू परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.
करिअर ३६० या शैक्षणिक संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार डॉ. पाटील यांनी भारतातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान प्राप्त केले होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठात ७० हून अधिक वैज्ञानिक घडविले आहेत. ज्ञानदान आणि ज्ञाननिर्मितीवर त्यांनी जास्त भर दिला आहे. गेल्या ३० वर्षे मटेरियल सायन्स या क्षेत्रात संशोधन करत आहेत. त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फेलोशिप, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स फेलोशिप, दक्षिण कोरियाची ब्रेन पूल फेलोशिपचा समावेश आहे.
विद्यापीठाने त्यांना सन २०१४ मध्ये गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. सौर घट, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटर या क्षेत्रात त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे. प्रा. पाटील आणि त्यांच्या टीमने सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये यश मिळविले आहे.
संशोधन क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कामगिरीची दखल या सर्वेक्षणात घेतली आहे. त्याचा खूप आनंद होत आहे. अव्वलस्थान मिळाल्याने विद्यापीठाचाही नावलौकिक झाला आहे.
-डॉ. पी. एस. पाटील.