शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू

By admin | Published: May 6, 2017 07:25 PM2017-05-06T19:25:05+5:302017-05-06T19:25:05+5:30

दुसऱ्या दिवशी ३ हजार ५४८ जणांची उपस्थिती, ४८१ जण गैरहजर

Shivaji University started the admission test | शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू

शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा सुरू

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : शिवाजी विद्यापीठातील विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या शनिवारी दुसर्या दिवशी ८ अभ्यासक्रमांसाठी ३,५४८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आॅफलाईन पद्धतीने परीक्षा दिली. तर ४८१ परीक्षार्थी गैरहजर राहिले.

कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ, सायबर, सातारातील यशवंतराव चव्हाण इन्सिस्टयूट आॅफ सायन्स, कराड येथील संत गाडगेबाबा महाविद्यालय, सांगली येथील वालचंद कॉलेज येथील केंद्रावर शनिवारी बी. लिब. सायन्स अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. लिब. सायन्स अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सायन्स, एम. एस्सी. मायक्रो बायॉलॉजी, एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम. एस्सी. भूगर्भशास्त्र, एम. एस्सी. फिजिक्स, दूरशिक्षण केंद्र- एम. बी. ए. (एक्झिक्युटिव्ह) अ‍ॅन्ड एम. बी. ए., एम. एस्सी स्टॅटिस्टिक्सया परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यासाठी ४०२९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली. त्यापैकी ३५४८ जणांनी परीक्षा दिली, तर ४८१ परीक्षार्थी गैरहजर होते.

या परीक्षांसाठी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत आणि रसायनशास्त्र विभाग आणि सायबर, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सांगलीतील सकाळी साडेनऊ ते साडेदहा, सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा, दुपारी एक ते अडीच आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा सत्रांमध्ये परीक्षा झाली. या परीक्षांसाठी सकाळ पासूनच शिवाजी विद्यापीठ परिसर गर्दीने फुलला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Shivaji University started the admission test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.