शिवाजी विद्यापीठ ‘नॅक’ मानांकनात राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:12+5:302021-04-01T04:26:12+5:30
नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यापीठाच्या ‘ए-प्लस प्लस’ या मानांकनापर्यंतच्या प्रवासात पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून सर्व कुलगुरू आणि विद्यापीठाच्या ...
नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यापीठाच्या ‘ए-प्लस प्लस’ या मानांकनापर्यंतच्या प्रवासात पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून सर्व कुलगुरू आणि विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाचे योगदान आहे. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी नॅकची पायाभरणी केली. संख्यात्मक, गुणात्मक निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
- डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
चौकट
मूल्यांकन झालेले दुसरे विद्यापीठ
नॅकच्या नव्या प्रक्रियेनुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये पहिल्यांदा औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मूल्यांकन झाले. या विद्यापीठाला ३.२३ गुणांसह ‘ए’ मानांकन मिळाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे मूल्यांकन झाले. आता नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मूल्यांकन होईल.
चौकट
विद्यापीठ शंभर कोटींच्या अनुदानासाठी पात्र
सर्वांगीण विकासासाठी युजीसी, रूसाकडून दिल्या जाणाऱ्या शंभर कोटींच्या अनुदानासाठी या मानांकनामुळे विद्यापीठ पात्र ठरले आहे. ‘ए-प्लस प्लस’ मानांकनाच्या विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून त्यांनाही संशोधन, शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
मानांकनातील निकषनिहाय मिळालेले गुण (चार पैकी)
अभ्यासक्रम : ४
अध्ययन-अध्यापन : ३.६१
संशोधन : ३.०९
पायाभूूूत सुविधा : ३.६५
विद्यार्थी सुविधा : ३.७९
प्रशासन : २.९५
चांगले उपक्रम : ३.८९
चौकट
शुभेच्छांचा वर्षाव
विद्यापीठाला ए-प्लस प्लस मानांकन मिळाल्याचे समजताच विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून कुलगुरू, प्र-कुलगुरू, आदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मानांकनाचा ई-मेल मिळाल्यानंतर कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी क्रांतीकुमार पाटील, डी. जी. कणसे, व्ही. एम. पाटील, मंगलकुमार पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो (३१०३२०२१-कोल-विद्यापीठ नॅक) : कोल्हापुरात बुधवारी शिवाजी विद्यापीठाला ‘ए-प्लस प्लस’ मानांकनाचा ई-मेल मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शेजारी व्ही. एन. शिंदे, एम. एस. देशमुख, आर. के. कामत, व्ही. एम. पाटील, क्रांतीकुमार पाटील, डी. जी. कणसे, व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते.