शिवाजी विद्यापीठ ठरले ‘ग्रीन चॅम्पियन’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:12 PM2022-02-01T12:12:44+5:302022-02-01T12:13:14+5:30

शिवाजी विद्यापीठाने यावर्षी प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला. 

Shivaji University was awarded this year's 'Kolhapur District Green Champion' by the Mahatma Gandhi National Council of Rural Education of the Central Government | शिवाजी विद्यापीठ ठरले ‘ग्रीन चॅम्पियन’

शिवाजी विद्यापीठ ठरले ‘ग्रीन चॅम्पियन’

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या यावर्षीच्या ‘कोल्हापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. त्याची माहिती या परिषदेचे अध्यक्ष डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्न कुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाला सोमवारी दिली.

या परिषदेमार्फत दरवर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्यूशनल पुरस्कार प्रदान केले जातात. याअंतर्गत जिल्हा स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता आणि हरितपणा या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाने यावर्षी प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला. 

दरम्यान, विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या जल व्यवस्थापन अभियानामुळे विद्यापीठ परिसर पाणी वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. दर मोसमात विद्यापीठ साधारण ३१ कोटी लिटर पाण्याचे संवर्धन करते. त्याचबरोबर दररोज चार लाख लिटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते. एकूण वीज वापरापैकी १६ टक्के वीज ही सौरऊर्जेपासून मिळविली जाते. 

विद्यापीठाने आपल्या ८५३ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. विद्यापीठ रोज सरासरी ५७५ किलो घनकचऱ्याचे व्यवस्थापन करते. पर्यावरण संवर्धनासाठी हरित विकास हा मूलमंत्र घेऊन विद्यापीठ वाटचाल करीत असून, त्या बळावरच विद्यापीठाला हे यश मिळाले असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.

निकष असे

या पुरस्कारासाठीच्या प्रमुख निकषांमध्ये जल व्यवस्थापन, सौरऊर्जा वापर, ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरितक्षेत्र, घनकचरा, भू-वापर आणि व्यवस्थापनाचा समावेश होता.

शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनासह पर्यावरणपूरक संवर्धनशील हरित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यापीठाचा अभियांत्रिकी व उद्यान विभाग देत असलेले योगदान लक्षणीय आहे. परिसराच्या स्वच्छतेसह ग्रीन प्रॅक्टिसेस राबविण्याबाबत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक हे सर्वच घटक सजग आहेत. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

Web Title: Shivaji University was awarded this year's 'Kolhapur District Green Champion' by the Mahatma Gandhi National Council of Rural Education of the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.