शिवाजी विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ परीक्षा मंडळ संचालक, अधिष्ठाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:18+5:302021-06-05T04:19:18+5:30

कोल्हापूर : दोन वर्षांनंतर आता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला पूर्णवेळ संचालक आणि चार विद्याशाखांना अधिष्ठाता मिळणार आहेत. ...

Shivaji University will have a full time Board of Examiner Director, Dean | शिवाजी विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ परीक्षा मंडळ संचालक, अधिष्ठाता

शिवाजी विद्यापीठाला मिळणार पूर्णवेळ परीक्षा मंडळ संचालक, अधिष्ठाता

googlenewsNext

कोल्हापूर : दोन वर्षांनंतर आता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला पूर्णवेळ संचालक आणि चार विद्याशाखांना अधिष्ठाता मिळणार आहेत. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबली होती. ती प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारपासून पुन्हा सुरू केली.

परीक्षा मंडळ व मूल्यमापन मंडळ, निरंतर शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालकपदाची, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्या शाखा, मानव्यशास्त्र शाखांचे अधिष्ठाता पदांचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी सांभाळत आहेत. आरक्षण, कोरोनामुळे या पदांच्या भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली. खुल्या प्रवर्गांमधील या रिक्त पदांच्या भरती करण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. त्यानंतर या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी शुक्रवारी सुरू केली. दरम्यान, व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार परीक्षा मंडळ संचालकपदासाठी यापूर्वी झालेल्या प्रक्रियेतील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

चौकट

एकूण २७२ परीक्षांचे निकाल जाहीर

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने हिवाळी सत्रातील एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी. एम. एस्सी. फूड सायन्स अभ्यासक्रमांच्या विविध बारा परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. आतापर्यंत एकूण २७२ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.

Web Title: Shivaji University will have a full time Board of Examiner Director, Dean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.