माणगाव परिषदेवर शिवाजी विद्यापीठ देशी-विदेशी भाषेत ग्रंथ निर्मिती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 07:21 PM2021-03-20T19:21:42+5:302021-03-20T19:24:17+5:30
Shivaji University Zp Kolhapur- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठकोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.
माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने सन्मान भूमी माणगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांना शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी अभिवादन करण्यात आले.
माणगांव परिषद राष्ट्रीय स्मारक समितीचे अनिल कांबळे माणगांवकर यांनी शिवाजी विद्यापीठाने पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषद संबंधित वृत्तांत, भाषणे, ठराव यांचे विद्यापीठातील हिंदी, इंग्रजी व परदेशी भाषा विभागांनी अनुवाद करून शताब्दी वर्षात जगभरातील विचारवंत व अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कुलगुरुंकडे केली. याचा संदर्भ देत कुलगुरु शिर्के यांनी ग्रंथ निर्मितीची घोषणा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केल्याचे सांगितले.