शिवाजी विद्यापीठाचा महिला सबलीकरणासाठी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:23 AM2019-10-10T00:23:34+5:302019-10-10T00:24:37+5:30
दोन्ही संस्थांना, तेथील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट आॅफ फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी आणि छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) संचलित कॉलेज आॅफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार झाला. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे.
या कराराअंतर्गत राष्ट्रीय परिषद आयोजन, सर्टिफिकेट कोर्सेस (वॉटर क्वालिटी स्टँडर्डस फॉर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज), ट्रेनिंग प्रोग्राम (फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम) आणि फूड टेक्नॉलॉजी व न्यूट्रिशन या क्षेत्रामध्ये एकत्रित संशोधन करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. ए. के. साहू, कॉलेज आॅफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेनचे प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, डिपार्टमेंट आॅफ फूड टेक्नॉलॉजीच्या विभागप्रमुख प्रा. स्नेहल खांडेकर, डॉ. अभिजित गाताडे, प्रा. अश्विनी रायबागकर, आदी उपस्थित होते.
कॉलेज आॅफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन हे महिला महाविद्यालय आहे. एम. एस्सी. फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली असल्याने, या करारामुळे महिला सबलीकरण निश्चित साध्य होईल. दोन्ही संस्थांना, तेथील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल.
- डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू