शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयएसओ’ मानांकनाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:25+5:302021-09-02T04:51:25+5:30

कोल्हापूर : ‘ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्ड लायझेशन’ (आय.एस.ओ.) या संस्थेने शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयएसओ- ९००१:२०१५’ मानांकनाच्या प्रमाणपत्राला मंगळवारी ...

Shivaji University's 'ISO' rating extended | शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयएसओ’ मानांकनाला मुदतवाढ

शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयएसओ’ मानांकनाला मुदतवाढ

Next

कोल्हापूर : ‘ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्ड लायझेशन’ (आय.एस.ओ.) या संस्थेने शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयएसओ- ९००१:२०१५’ मानांकनाच्या प्रमाणपत्राला मंगळवारी एक वर्षासाठी मुदतवाढ दिली.

विद्यापीठाला सन २०१९ मध्ये सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान केले. मानांकन देणाऱ्या संस्थेकडून यावर्षीच्या प्रमाणपत्रासाठी मंगळवारी विद्यापीठाची ऑनलाईन पाहणी केली. या संस्थेच्या त्रिसदस्यी समितीने विद्यापीठातील अर्थशास्त्र, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रंथालय शास्त्र या अधिविभागांसह प्रशासनातील वित्त, प्रशासन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, परीक्षा अशा सात विभागांची माहिती घेतली. तेथील अधिकारी, कर्मचारी समवेत चर्चा केली. पाहणीच्या समारोप वेळी या समितीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी संवाद साधला. शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नव तंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षा विषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया, पदवी प्रदान प्रक्रिया आदींची सर्वंकष पाहणी झाली. समितीने समाधानकारक शेरा नोंदवित विद्यापीठाच्या आयएसओ मानांकन प्रमाणपत्राला एक वर्षाची मुदतवाढ दिली असल्याची माहिती अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली.

चौकट

४१,८५४ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यापीठाच्या सध्या उन्हाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. त्यात मंगळवारी ४१,८५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., एम.ए., एम. एस्सी., बीसीए., एमसीए., एमएसडब्ल्यू, आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दि. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव परीक्षा देता आली नाही. त्यांनी याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंद करावी, असे आवाहन परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी केले.

Web Title: Shivaji University's 'ISO' rating extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.