शिवाजी विद्यापीठाची ‘नॅक’ तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:58+5:302021-03-04T04:43:58+5:30
डागडुजी, रंगरंगोटीच्या कामात अटींचा भंग विद्यापीठात ‘नॅक’च्या पार्श्वभूमीवर इमारतीची डागडुजी, रंगरंगोटीसह इतर कामे सुरू आहेत. त्याची पाहणी केली असता ...
डागडुजी, रंगरंगोटीच्या कामात अटींचा भंग
विद्यापीठात ‘नॅक’च्या पार्श्वभूमीवर इमारतीची डागडुजी, रंगरंगोटीसह इतर कामे सुरू आहेत. त्याची पाहणी केली असता निविदेमध्ये असलेल्या अटी, शर्तीचा भंग झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी याबाबत आम्ही तक्रार दिली होती. त्यावर संबंधितावर जुजबी कारवाई करून अभय देण्यात आले. निविदेप्रमाणे काम झाले नाही तर, आणि ठेकेदारांचे हित जपण्यासाठी जर त्यांना पुन्हा अभय देण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) पदाधिकारी, कार्यकर्ते दि. १५ मार्च रोजी नॅक समितीची भेट घेऊन त्याबाबतची माहिती देईल, असा इशारा मनविसेचे शहराध्यक्ष मंदार पाटील यांनी दिला.
चौकट
नांदेड विद्यापीठाचे मूल्यांकन लांबणीवर
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनासाठी समिती या आठवड्यात तेथे भेट देणार होती. मात्र, समितीने ही भेट लांबणीवर टाकली आहे. मात्र, या समितीने शिवाजी विद्यापीठाला अद्याप कोणताही बदल कळविलेला नाही.