भूजल सर्वेक्षणातील संशोधनाला शिवाजी विद्यापीठाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:22+5:302021-09-06T04:27:22+5:30

कोल्हापूर : राज्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोलशास्त्र अधिविभाग यांच्यादरम्यान शनिवारी सामंजस्य करार झाला. त्यामुळे ...

Shivaji University's strength in groundwater survey research | भूजल सर्वेक्षणातील संशोधनाला शिवाजी विद्यापीठाचे बळ

भूजल सर्वेक्षणातील संशोधनाला शिवाजी विद्यापीठाचे बळ

Next

कोल्हापूर : राज्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोलशास्त्र अधिविभाग यांच्यादरम्यान शनिवारी सामंजस्य करार झाला. त्यामुळे भूजल सर्वेक्षणातील संशोधनास विद्यापीठाचे बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासालाही चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया भूजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करार झाला.

भूजल क्षेत्रातील संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानात्मक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील तंत्रज्ञान, क्षेत्रीय अभ्यास यांची माहिती प्राप्त करण्याबरोबरच त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये सहभागी होता येणार आहे. भूजल सर्वेक्षण विभाग व विकास यंत्रणा विभागाचे आयुक्त डॉ. कलशेट्टी आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. आर. के. कामत, भूवैज्ञानिक ऋषिकेश गोसकी, भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. शिंदे, एस. एस. पन्हाळकर, एस. के. पवार, मीना पोतदार आदी उपस्थित होते.

संयुक्त प्रकल्प राबविता येणार

संयुक्त प्रकल्पही राबविता येणार आहे. भूजल व भूशास्त्रविषयक विविध संशोधन उपक्रम, अध्यापन आणि प्रशिक्षण, भूजल मॉडेलिंग, पर्यावरण प्रभाव आणि विश्लेषण, सुदूर संवेदन (Remote Sensing), तंत्रज्ञान व्यवस्थापन व हस्तांतरण, भूजल गुणवत्ता व पाणी तपासणी, सुविधांबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन सल्ला व आवश्यक साहाय्य, ग्रामीण विकास व कृषी क्षेत्रात सहभागाची संधी म्हणून विद्यार्थ्यांना शासकीय उपक्रमांत व योजनांमध्ये क्षेत्रीय काम करण्याची अनुमती आणि भू-भौतिक, चुंबकीय व विद्युत चुंबकीय सर्वेक्षण, गुरुत्वीय व भूकंप, आदींबाबत संयुक्त संशोधन, अभ्यास, क्षेत्रीय काम घटकांसंबंधित काम करता येणार आहे.

फोटो (०५०९२०२१-कोल-भूजल करार) : राज्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोलशास्त्र अधिविभाग यांच्यादरम्यान शनिवारी सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आदी उपस्थित होते.

050921\05kol_1_05092021_5.jpg

फोटो (०५०९२०२१-कोल-भूजल करार) : राज्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोलशास्त्र अधिविभाग यांच्यादरम्यान शनिवारी सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Shivaji University's strength in groundwater survey research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.