शिवाजीराव पाटील यांचे सामाजिक कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:58+5:302021-07-02T04:16:58+5:30
सावरवाडी : वारकरी संप्रदायाची विचारधारा जपत शिवाजीराव पाटील यांनी गेली अनेक वर्षे सहकार चळवळ आणि सामाजिक कार्यात ...
सावरवाडी : वारकरी संप्रदायाची विचारधारा जपत शिवाजीराव पाटील यांनी गेली अनेक वर्षे सहकार चळवळ आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केले असून, पुरोगामी विचाराची शिकवण देत जनतेच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या पाटील यांचे कार्य हे नव्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहे, असे प्रतिपादन गोकूळ दुध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे ज्येष्ठ सहकार नेते कै. शिवाजीराव पाटील यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत, शिवाजीराव कृष्णा पाटील कला क्रीडा युवक मंडळ व अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा कांबळे होत्या.
या वेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, शाहू छत्रपती दूध संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, बलभीम सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी सरपंच नंदू पाटील उपस्थित होते.
फोटो : ओळ- शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे कै. शिवाजीराव पाटील यांच्या बाराव्या स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सचिन पाटील, सरदार पाटील, अनिल सोलापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.