‘शिवभोजन’ने भागवली पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:25 AM2020-10-09T02:25:07+5:302020-10-09T02:25:14+5:30
कष्टकरी, वंचितांसाठी आधार; कोल्हापुरात पावणेसहा लाख लोकांनी घेतला लाभ
- नसिम सनदी
कोल्हापूर : कोरोनाकाळात घराघरांत खाण्याचे वांदे होत असताना राज्य सरकारच्या शिवभोजन थाळीने मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कष्टकऱ्यांची भूक भागवण्याचे काम केले आहे. अवघ्या पाच रुपयांत मिळणारी ही थाळी कष्टकरी, वंचितांसाठी आधार झाल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दक्षिणेतील राज्यांच्या गरीब थाळीच्या धर्तीवर २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन थाळी सुरू केली आहे. मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागल्यानंतर खºया अर्थाने या थाळीची किंमत अनेकांना कळली. एकट्या मे मध्ये मागणी एक लाख १२ हजारांवर गेली. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना किमान एकवेळचे तरी पोटभर जेवण मिळावे म्हणून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान कमी न करता, थाळीची किंमत १० वरून पाच रुपयांवर आली. कोरोनामुळे अर्थचक्र रुळावर आलेले नसल्यामुळे ही किंमत पुढील आदेश येईपर्यंत वाढवली जाणार नाही.
कष्टकºयांना डोळ्यांसमोर ठेवूनच ही थाळी सुरू करण्यात आली असून, त्याचा गरजवंतांनाच लाभ होईल, याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. सर्व केंद्रचालकांचेही चांगले सहकार्य असून कोणाचीही तक्रार नाही. - दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी