शिवछत्रपतींची जगदंबा तलवार परत मिळण्यासाठी घेतले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:39+5:302021-03-30T04:13:39+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीविषयी शिवदुर्ग संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगितलेली माहिती शिवछत्रपतींच्या अनेक तलवारी पैकी करवीर छत्रपती घराण्याकडे ...

Shivchhatrapati's Jagdamba sword was taken to get it back | शिवछत्रपतींची जगदंबा तलवार परत मिळण्यासाठी घेतले कोंडून

शिवछत्रपतींची जगदंबा तलवार परत मिळण्यासाठी घेतले कोंडून

googlenewsNext

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीविषयी शिवदुर्ग संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगितलेली माहिती शिवछत्रपतींच्या अनेक तलवारी पैकी करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी एक जगदंबा नावाची तलवार आज इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) हे अल्पवयीन (११ वर्षे) असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला असता सन १८७५-७६ मध्ये त्यांना जबरदस्तीची भेट म्हणून दिली होती. ही इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे. यासाठी आजची आमची कठोर भूमिका असल्याची माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या बैठकीतून देण्यात आली.

शिवछत्रपतींची तलवार मिळविण्याबाबत आंदोलनचा एक भाग म्हणून पन्हाळा येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन हे कठोर आंदोलन सुरू केले असल्याचे संवर्धनचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले.

फोटो------- पन्हाळा येथील सज्जाकोठीच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेले शिवदुर्ग संवर्धनचे शिवप्रेमी.

Web Title: Shivchhatrapati's Jagdamba sword was taken to get it back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.