शिवप्रताप दिनाला उध्दव ठाकरे येणार

By admin | Published: November 18, 2014 08:52 PM2014-11-18T20:52:58+5:302014-11-18T23:37:20+5:30

मिलिंद एकबोटे : प्रतापगड उत्सव समितीला मुख्यमंत्र्यांची परवानगी

Shivpratap Dinala Uddhav Thakre will come | शिवप्रताप दिनाला उध्दव ठाकरे येणार

शिवप्रताप दिनाला उध्दव ठाकरे येणार

Next

सातारा : ‘प्रतापगड उत्सव समितीतर्फे यंदाचा शिवप्रतापदिन प्रतापगडावरच साजरा करणार आहे. शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली असून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती प्रतापगड उत्सव समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तब्बल दहा वर्षांनंतर प्रतापगडावर उत्सव समितीला गडावर उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मिलींद एकबोटे याबाबत बोलताना म्हणाले, ‘प्रतापगडावर हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाचा देदिप्यमान आणि प्रेरणादायी इतिहास घडला होता. शिवप्रभूंच्या त्या पराक्रमाची आठवण महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठीच प्रतिवर्षी आपण शिवप्रतापदिन साजरा करतो; परंतु यंदा हा उत्सव प्रतापगडावरच साजरा करण्याची संधी आपल्याला लाभली आहे. या सोहळ्याला भिडे गुरुजी, शिवसेना नेते दिवाकर रावते, विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव, विजयाताई भोसले, राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.’
दरम्यान, १९९६ सालापासून प्रतापगड उत्सव समितीतर्फे हा उत्सव साजरा केला जात आहे. गडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बांधकामावरुन वाद निर्माण झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी दंगलही घडली होती. यानंतर प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाचा उत्सव जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थित साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या नऊ वर्षांपासून प्रशासन हा उत्सव साजरा करत आहे. २00५ व २00६ साली प्रतापगड उत्सव समितीने राजगडाच्या पायथ्याला स्वतंत्रपणे उत्सव साजरा केला. त्यानंतर वाई शहरात हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी पुण्यामध्ये हा उत्सव साजरा झाला होता. उत्सव समितीचा वाई व पुणे येथे उत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Shivpratap Dinala Uddhav Thakre will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.