रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 02:57 PM2017-05-31T14:57:22+5:302017-05-31T14:57:22+5:30

देभरातून लाखो शिवभक्त येणार : फत्तेसिंह सावंत दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

Shivrajyabhishek Din Sangeal on Raigad Tuesday | रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा

रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा

googlenewsNext

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३१ : दुर्गराज किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (दि.६) शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्र व देशभरातून लाखो शिवभक्त या सोहळ्यात सामील होण्यासाठी येणार आहेत. सोमवार (दि.५) व मंगळवार (दि.६) असे दोन दिवस या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सावंत म्हणाले, समितीचे मार्गदर्शक व शिव-शाहूंचे वारसदार खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सोहळा साजरा होतो. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, बंगाल, गुजरात, बडोदा, भोपाळ, हरियाणासह देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर जमणार आहेत. यामध्ये इतिहास संशोधक, अभ्यासक, इतिहास पे्रमी, शिवभक्तांचा समावेश आहे.

सोमवारी (दि.५) गडपूजनाने सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महादरवाजाला तोरण, शिरकाई देवीचा गोंधळ, शाहीर, शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके, पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच दुर्गसंवर्धनासाठी राज्यभरात काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि शिवभक्तांचा सायंकाळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या मुख्य दिवशी मंगळवारी (दि.६) रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारुन सोहळ्याची सुरुवात होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. रणवाद्य हलगी, घुमक व कैताळाच्या कडकडाटात होळीच्या माळावर शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या लोकोत्सवात भव्य पालखी सोहळा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे. त्यांना संभाजीराजे मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर महिलाव पुरुषांची ढोेल-ताशा पथके, पुण्यातील रणवाद्य ढोल ताशा पथक व सह्याद्री गर्जना ढोल ताशा पथक, शिवतीर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक ही सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत. यावेळी हेमंत साळोखे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, अमर पाटील, सुखदेव गिरी, संजय पोवार, सागर यादव, शाहीर दिलीप सावंत, सन्मान श्ोटे, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.

रायगडावर चर्चासत्र

रायगडच्या संवर्धन व विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे. त्याचा शासनाकडून विकास आराखडा तयार झाला असून यावर महाराष्ट्रातील शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, पर्यावरण प्रेमी, प्रशासन, स्थानिक रहीवाशी यांच्या मतांचा अभ्यास करुन रायगड संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यात आला तर तो जास्त प्रभावशाली होईल. यासाठी सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ‘संवर्धन रायगडाचे...मत शिवभक्तांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. असे सावंत यांनी सांगितले.

१ हजार स्वयंंसेवकांची फौज सज्ज

सोहळ्यासाठी समितीतर्फे ४० कमिट्या स्थापन करण्यात आली असून १हजार स्वयसेवकांची फौज उभी करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी दोन ते अडीच लाख शिवभक्त उपस्थित राहतील, असे सावंत यांनी सांगितले.

दीड लाख लोकांसाठी अन्न छत्र

सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांकरीता रायगडावर दीड लाख लोकांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे.यासाठी ५०० स्वयंसेवक कार्यरत राहणार असल्याचे हेमंत साळोखे यांनी सांगितले.

Web Title: Shivrajyabhishek Din Sangeal on Raigad Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.