शिवतेज गस्तीची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:10+5:302021-01-09T04:20:10+5:30
इचलकरंजी : ‘डीकेटीई’मधून फॅशन टेक्नॉलॉजी पदवीप्राप्त विद्यार्थी शिवतेज गस्ती याची ‘मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनिव्हर्सिटी ऑफ ...
इचलकरंजी : ‘डीकेटीई’मधून फॅशन टेक्नॉलॉजी पदवीप्राप्त विद्यार्थी शिवतेज गस्ती याची ‘मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया-सिडनी) विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. त्याला केंद्र सरकारची नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप (८२ लाख शिष्यवृत्ती) मिळाली आहे.
शिवतेजने ‘डीकेटीई’मध्ये फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असताना सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. शैक्षणिक गुणवत्तेमध्येही अव्वल असणारा विद्यार्थी म्हणून तो परिचित आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जीआरई व आयईएलटीएस या स्पर्धांमध्ये तो उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. याचा फायदा होत त्याला भारत सरकारची ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप’ मिळाली आहे. त्याची युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया-सिडनी) येथील विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर व सचिव डॉ. सपना आवाडे यांनी त्याचे कौतुक केले. शिवतेज याला प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. एल. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
‘डीकेटीई’च्या शिवतेज गस्तीची परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी निवड (फोटो) ०८०१२०२१-आयसीएच-०१ (शिवतेज गस्ती)
(सदरची बातमी सातारा आवृत्तीसाठीही घ्यावी, ही विनंती.)