कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:49 AM2018-05-26T01:49:00+5:302018-05-26T01:49:00+5:30

महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहांत दोन्ही काँग्रेसकडे स्पष्ट ४४ सदस्यांचे बहुमत होते

Shobha Bondre of Congress is the Mayor of Kolhapur | कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या शोभा बोंद्रे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे ४४ विरुद्ध ३३ मतांनी विजयी झाले. त्यांनी ताराराणी आघाडीच्या रूपाराणी निकम व भाजपच्या कमलाकर भोपळे यांचा पराभव केला.
या विजयाने सत्तारूढ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या सत्तेवरील पकड कायम ठेवली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्ता काढून घेण्यासाठी जरूर प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. राज्याच्या राजकारणातील संघर्ष या निवडणुकीतही उमटल्याने शिवसेनेने तटस्थ राहून भाजपचा ‘गेम’ केला.
महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहांत दोन्ही काँग्रेसकडे स्पष्ट ४४ सदस्यांचे बहुमत होते; परंतु फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभागृहात महसूलमंत्री पाटील व महाडिक यांनी पडद्याआड फिल्डिंग लावून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.

Web Title: Shobha Bondre of Congress is the Mayor of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.