शोभाताई कोरे ग्राहक विमा अभियान राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:44+5:302021-04-02T04:25:44+5:30
वारणा बझारचा ४४ वा वर्धापनदिन २ एप्रिल रोजी होत असून, या दिवशी वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई ...
वारणा बझारचा ४४ वा वर्धापनदिन २ एप्रिल रोजी होत असून, या दिवशी वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या नावाने या ग्राहक विमा अभियानाची सुरुवात होणार आहे.
बझारच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व लग्नसराईच्या निमित्ताने परिसरातील ग्राहकांसाठी वारणा बझारसह ५० शाखांतून ग्राहक विमा अभियान उपक्रम राबविला जाणार आहे.
ग्राहकाने एकावेळी एक हजार रुपयांच्या केलेल्या खरेदीवरती ५० हजार रुपयांचा विमा पॉलिसीची भेट, तर एकाच वेळी दोन हजार रुपयांच्या केलेल्या खरेदीवरती सुमारे एक लाख रुपयांची विमा पॉलिसी भेट मिळणार असून, २ एप्रिल ते ३० जून २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत अभियान सुरू राहणार असल्याचे आ. विनय कोरे व शरद महाजन यांनी सांगितले.
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार क्लेमच्यावेळी संबंधित ग्राहकाचे आधार कार्ड, पॅनकर्ड, इतर कागद आवश्यक आहे. वारणा परिसरातील जास्तीत-जास्त ग्राहकांनी वारणा बझारमध्ये खरेदी करून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सभासदांना पूर्ण वर्षामध्ये शेअर्स रकमेवरती ३२ टक्के रिबेट देणार आहे.
यावेळी बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक विजयसिंह जाधव, इतर संचालक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शिवाजी पाटील, अक्षय पाटील, बझारच्या अरुणा गुरव, दिलीप पाटील, संदीप पाटील, तानाजी ढेरे, महेश आवटी, हणमंत दाभाडे, प्रदीप शेटे, पी. बी. बंडगर, आदी उपस्थित होते.
फोटो-