Indian Army Agniveer: शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:10 AM2022-12-11T11:10:49+5:302022-12-11T11:11:19+5:30

अग्निवीर भरतीच्या तरुणांना स्टेरॉइडचा विळखा, भरतीस्थळी इंजेक्शनचा खच : ओव्हरडोसमुळे तरुण बेशुद्ध

Shocking! Agniveer joins army with taking doses of steroids; revealed when the youth fell unconscious in Recruitment drive | Indian Army Agniveer: शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड

Indian Army Agniveer: शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड

Next

- उद्धव गोडसे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात सुरू असलेल्या अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत तात्पुरत्या ऊर्जेसाठी तरुणांकडून स्टेरॉइडचा वापर सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी स्टेरॉइडच्या ओव्हरडोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्याने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेची तारांबळ उडाली. भरतीस्थळी असलेल्या स्वच्छतागृहात तर स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा अक्षरश: खच पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान होणारा स्टेरॉइडचा वापर आणि बाजार उघडकीस आला आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत तरुणांसमोर प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत मागे पडणारा मागेच राहतो, त्यामुळे धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर केला जातो. चाचणी सुरू होण्याआधी काही मिनिटे हे इंजेक्शन घेतल्यानंतर तरुणांमध्ये तात्पुरती ऊर्जा वाढते, परिणामी स्पर्धेत त्याची धावण्याची गती वाढते. 

दोन दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील तरुण भरती प्रक्रियेसाठी आले होते. मध्यरात्रीनंतर एका तरुणाने हे इंजेक्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. तरुण बेशुद्ध पडताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. तातडीने उपचार केल्याने अनर्थ टळला.

पाच हजारांना एक इंजेक्शन?
nअनेक उमेदवार येतानाच स्वत:सोबत स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन येतात. सायबर चौकात स्टेरॉइडच्या इंजेक्शनची विक्री करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याचीही माहिती मिळाली. 
nपाच हजार रुपयांना एका इंजेक्शनची विक्री केली जात आहे, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांचे अज्ञान आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन हजारो रुपयांची लूट सुरू असल्याचेही समोर येत आहे.

तपासणीची गरज
कडेकोट बंदोबस्तात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान तरुणांकडे स्टेरॉइडचे इंजेक्शन मिळणे हे अत्यंत धक्कादायक आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन तरुण हे इंजेक्शन घेत आहेत, पण प्रवेशद्वारावरच त्यांच्या बॅगची तपासणी का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सैन्य भरती, पोलिस भरती आणि खेळांमध्ये ऊर्जावर्धक इंजेक्शनच्या वापरास परवानगी नाही. त्याच्या वापराने तात्पुरती ऊर्जा आणि उत्साह वाढतो, पण त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Web Title: Shocking! Agniveer joins army with taking doses of steroids; revealed when the youth fell unconscious in Recruitment drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.