बिनकामी दुभाजक वाहनचालकांसाठी कर्दनकाळ

By admin | Published: April 17, 2015 09:50 PM2015-04-17T21:50:48+5:302015-04-18T00:10:39+5:30

निसरेफाटा येथे वाहतुकीस धोका : अपघातांमध्ये वाढ; दुभाजक काढण्याची नागरिकांची मागणी

Shockwave for non-commercial bizarre drivers | बिनकामी दुभाजक वाहनचालकांसाठी कर्दनकाळ

बिनकामी दुभाजक वाहनचालकांसाठी कर्दनकाळ

Next

राजेंद्र लोंढे- मल्हारपेठ निसरे फाटा येथील तिकाटण्यात बिनकामाचा दुभाजक मध्येच ठेवल्याने शेकडो अपघात होत असून, बांधकाम खाते याकडे मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशातून होत
आहे.पाटण, कराड, उंब्रज मार्गाकडे जाणारे निसरे फाटा येथे तिकाटणे आहे. या चौकाचे २००० साली विस्तारीकरण करून संपूर्ण निसरे फाटा रुंदीकरण केला व ‘बीओटी’ तत्त्वावर टोल नाका सुरू केला. त्यावेळी ठेकेदारांनी रुंदीकरण करताना पिकअप शेड उद्ध्वस्थ केले व रस्त्यामध्ये दुभाजक टाकले. त्यावेळी रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट, दुभाजक दर्शक फलक व लाईट रिफ्लेक्टर नसल्याने टोलनाक्याच्या पूर्वेकडील बाजूस सातत्याने दुभाजकाला धडक लागून रात्रीचे लहान-मोठ्या वाहनांचे अपघात होऊ लागले. अनेकवेळा दुभाजक पुन्हा-पुन्हा बांधले; परंतु आठवड्यातून एक तरी वाहन धडकून ते कठडे उद्ध्वस्थ होत होते. हा मार्ग म्हणजे गुहागर, पंढरपूर, चिपळूण, पाटण, विजापूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. दिवसरात्र सातत्याने निसरे फाट्यावर गर्दी व वाहनांची ससत वर्दळ असते.
सध्या गेल्या दोन वर्षांपासून निसरे टोलनाका बंद करण्यात आला आहे. या परिसराची सर्व देखभाल बांधकाम खाते करीत आहे. यामार्गाची डागडुजी बांधकाम प्रशासन करीत असताना विनालाईट रिफ्लेक्टरचे हे २५ फूट लांबीचे, बिनकामाचे रस्ता दुभाजक मध्येच का ठेवलेत या प्रश्नाचे उत्तर अजुनती अनुत्तरीत आहे. हा धोकादायक दुभाजक काढण्यासाठी नागरिक व वाहनधारकांनी वारंवार मागणी केली. तरीही बांधकाम विभागाला या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या दुभाजकांमुळे रात्रीच्या वेळी अपघात होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा या दुभाजक संबंधित विभागाने तत्काळ हटवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाविषयी सातारा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांनी ‘हे काम पश्चिम विभागाशी संबंधित आहे. त्यांच्याशी संपर्क करून विचारा,’ असे सांगण्यात आले. अशा प्रकारे बांधकाम विभाग ही समस्या मिटविण्याऐवजी टोलवाटोलवी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे
या दुभाजकामुळे आजपर्यंत अनेत लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना अपंगत्व आले आहे. या दुभाजकामुळले वाहतुकीस धोका निर्माण होत असल्याने दुभाजक तत्काळ हटविने गरजेचे आहे.
- मधुकर माने, वाहनधारक

Web Title: Shockwave for non-commercial bizarre drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.