उधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 07:27 PM2020-04-06T19:27:04+5:302020-04-06T19:54:52+5:30

दुकानातून उधारीवर साहित्य का देत नाही, असा जाब विचारत दुकानदारासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कदमवाडी येथे घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. संजय आनंदराव शहापुरे, अमय सुरेश जाधव (रा. कोपार्डे कॉर्नर, कदमवाडी) हे जखमी झाले. दुकानदार मयूर माणिक शहापुरे यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रसाद आबाजी आडुळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी), सौरभ कागीनकर (रा. चव्हाण गल्ली, भोसलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Shopkeeper kills all three with rods for no credit | उधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाण

उधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाण

Next
ठळक मुद्देउधार का देत नाही म्हणून दुकानदारांसह तिघांना रॉडने मारहाणकदमवाडीतील घटना : दोघे गंभीर जखमी; दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : दुकानातून उधारीवर साहित्य का देत नाही, असा जाब विचारत दुकानदारासह त्याच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कदमवाडी येथे घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. संजय आनंदराव शहापुरे, अमय सुरेश जाधव (रा. कोपार्डे कॉर्नर, कदमवाडी) हे जखमी झाले. दुकानदार मयूर माणिक शहापुरे यांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रसाद आबाजी आडुळकर (रा. माळ गल्ली, सुवर्णदीप अपार्टमेंट, कदमवाडी), सौरभ कागीनकर (रा. चव्हाण गल्ली, भोसलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कदमवाडीत कोपार्डे कॉर्नर येथे मयूर शहापुरे यांचे रविकिरण किराणा स्टोअर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री ते आपले दुकान बंद करत होते. त्याचवेळी तेथे प्रसाद आडुळकर, सौरभ कागीनकर हे दोघे आले. त्यांनी मयूर व त्याचे वडील माणिक शहापुरे यांना तुम्ही किराणा साहित्य उधार का देत नाही, आमची भीती राहिली नाही का? असा जाब विचारत मारहाण व शिवीगाळ केली. त्यावेळी गोंधळ, आरडाओरडा झाल्याने मयूरचे चुलते संजय शहापुरे व पुतणे अमय जाधव हे दोघे धावतच तेथे आले.

त्यावेळी संशयितांनी हातातील लोखंडी रॉडने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यात संजय शहापुरे व अमय जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दुकानदार मयूर शहापुरे यांनी तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश भंडारे करत आहेत.
 

 

Web Title: Shopkeeper kills all three with rods for no credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.