रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

By admin | Published: May 16, 2017 06:43 PM2017-05-16T18:43:04+5:302017-05-16T18:43:04+5:30

जिल्हा पुरवठा विभागाची सभा

Shoppers should adopt an independent approach: Avinash Subhadar | रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे : अविनाश सुभेदार

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : पीओएस मशिनद्वारे रेशनिंग व्यवहार हा शासनाचा निर्धार आहे. त्यामुळे रास्तभाव धान्य दुकानदारांनी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे दुकानदारांनाही अर्थिक लाभ मिळावा म्हणून त्यांना बँकिंग प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. भविष्यातही दुकानदारांसाठी चांगले निर्णय घेण्यात येतील. त्यांच्या आडचणीही दूर केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्याने १५ मे अखेर संपुर्ण राज्यात २ लाख ५५ हजारांहून अधिक शिधापत्रिकेवर पीओएसद्वारे व्यवहार केले आहेत. त्यावर ६० लाख किलो धान्य वाटप केले आहे. यात राज्यात कोल्हापूर जिल्हा अघाडीवर आहे. पुढील कालावधीत देखील कामगिरीत सातत्य रहावे यासाठी रास्तभाव धान्य दुकानदारांसह क्षेत्रीय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व संबधित घटकांची संयुक्त सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक ठिकाणी रास्तभाव दुकानांसाठीचे धान्य अन्यत्र वळविल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. अशा बाबींना आळा घालणे, पारदर्शी व्यवहारासाठी बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, बायोमेट्रीक रेशनिंगमध्ये राज्यात प्रथम येण्यासाठी कोल्हापूरकरांनी दिलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मनाला पटलेल्या गोष्टी अंमलात आणण्यामध्ये कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. यापुढेही सर्वानी सहकार्य करावे.

या सभेमध्ये बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये कोल्हापूरला अव्वलस्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलेले रास्तभाव धान्य दुकानदार, पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी रेवडेकर, आदी उपस्थित होते.

नवनवीन संकल्पनांमध्ये कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग

बायोमेट्रीक रेशनिंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करुन कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतील आहे. हे यश कोल्हापूरवासीयांच्या उस्फुर्त सहभागामुळे साध्य झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष आचरणात आणणारा कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरचा माणूस हा नवनवीन संकल्पना राबविण्यामध्ये उस्फुर्त सहभागी असतो, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Shoppers should adopt an independent approach: Avinash Subhadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.