संपूर्ण लॉकडाऊनपूर्वीच्या तयारीसाठी दुकाने सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 AM2021-04-12T04:23:21+5:302021-04-12T04:23:21+5:30
कोल्हापूर : येत्या दोन- तीन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने, तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी आपली ...
कोल्हापूर : येत्या दोन- तीन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने, तत्पूर्वी विविध पूर्तता करण्यासाठी राज्यातील व्यापारी सोमवारी आपली दुकाने दहा ते पाच या वेळेत सुरू करतील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी रविवारी दिली.
वर्षअखेरनंतरच्या सरकारी कामकाजाची पूर्तता, तसेच अन्य बाबींची तयारी लॉकडाऊनपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाबाबतच्या निकषांचे पालन करून सोमवारपासून राज्यातील व्यापारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या मर्यादित वेळेत व्यापार सुरू करणार आहेत. सर्व जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. राज्यभरातील व्यापाऱ्यांनी कोरोनासंबंधीच्या निकषांचे कठोरपणे पालन करावे. मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन यांचे कसोशीने पालन करावे. दुकानदारांनी स्वतः आणि आपल्या कामगारांच्या तपासण्या करून, व्हॅक्सिनेशन लवकर करून घ्यावे, असे आवाहन संतोष मंडलेचा आणि ललित गांधी यांनी केले आहे.