आसुर्लेत शाॅर्टसर्किटने ट्रॅालीतील गवत पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:40 AM2021-02-18T04:40:58+5:302021-02-18T04:40:58+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले (ता.पन्हाळा) येथील रस्त्याच्या आडवी गेलेल्या विजेच्या तारेला ट्राॅलीतील गवताच्या भाऱ्याचा स्पर्श होऊन, शाॅर्टसर्किटमुळे ट्राॅलीतील ...
पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले (ता.पन्हाळा) येथील रस्त्याच्या आडवी गेलेल्या विजेच्या तारेला ट्राॅलीतील गवताच्या भाऱ्याचा स्पर्श होऊन, शाॅर्टसर्किटमुळे ट्राॅलीतील गवत जळून खाक झाले. गवत जळाल्याने अंदाजे १५ हजारांचे नुकसान झाले. चालकाने जळणाऱ्या गवताची ट्राॅली रस्त्यावरच रिकामी केल्याने अनर्थ टळला.
रस्त्याच्या आडव्या लोंबकळणाऱ्या तारा वाहतुकीला अडथळा आणि जीवघेण्या बनत असल्याची तक्रार महावितरण कंपनीकडे वारंवार केली होती; परंतु संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. या रस्त्यावरून उसाची व अन्य वाहतुकीची वर्दळ सुरू असते. महावितरण कंपनी काय मोठा अनर्थ घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी करीत घटनेबाबत संताप व्यक्त केला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आसुर्ले येथील भुजंग दगडू पाटील यांनी खोपकरवाडीतून येथून ट्रॅक्टर-ट्रॅालीतून बुधवारी सकाळी खोपकरवाडी रस्त्यावर येत असताना रस्त्याच्या आडवी गेलेल्या विजेच्या तारेला गवतचा स्पर्श होऊन शार्टसर्किट होऊन गवतावर ठिणग्या पडल्याने ट्राॅलीतील गवताने पेट घेतला. चालकाने ट्राॅलीतील जळणारे गवत रस्त्यावर उलटून अनर्थ टाळला.