‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून लघुपट महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 05:40 PM2020-01-27T17:40:23+5:302020-01-27T18:01:04+5:30

‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून आयोजित ‘लोकसत्ताक लघुपट महोत्सव’ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

Short film festival in celebration of justification for 'Republic Day' | ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून लघुपट महोत्सव उत्साहात

‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून लघुपट महोत्सव उत्साहात

Next
ठळक मुद्दे‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून लघुपट महोत्सव उत्साहातनऊ पुरस्कार विजेते लघुपट

कोल्हापूर : ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून आयोजित ‘लोकसत्ताक लघुपट महोत्सव’ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी ‘सेव्हन सेकंद कलेक्टिव्ह’चे नऊ पुरस्कार विजेते लघुपट दाखविण्यात आले. यात ‘द फ्रेम आॅफ साउंड’, ‘इन्स्पिरेशन आॅफ कोल्हापूर’, ‘कोलाज’, ‘आर्म थीफ’, ‘माझं गाव’, ‘परमावधी’, ‘नाऊ युअर होम’, ‘रबरबँड’, ‘अडगळ’ या लघुपटांचा समावेश आहे.

सेव्हन सेकंदचे प्रशांत सुतार, प्रसाद महेकर, जयसिंग चव्हाण, प्रशांत भिलवडे उपस्थित होते. यावेळी ‘दृष्टिकोन’ हा अरुण अडसुळे दिग्दर्शित लघुपटही पहिल्यांदाच दाखविण्यात आला.

लघुपटांवर झालेल्या संवादात अभिनेत्री डॉ. चंद्रभागा चोखा, अभिषेक मिठारी, इर्शाद वडगावकर, दत्ता घुटुकडे, अमर सकटे, महादेव शिंगे, स्वप्निल बारवेकर यांनी सहभाग घेतला.

प्रा. विलास आंबोळे यांच्या हस्ते आणि खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. आयोजक किरण गवळी यांनी आभार मानले.
 

 

Web Title: Short film festival in celebration of justification for 'Republic Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.