थोडक्यात महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:37+5:302020-12-17T04:47:37+5:30
गडहिंग्लज : पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीच्या ‘नागीण’ कथेची अंतिम फेरीत निवड ...
गडहिंग्लज : पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत गडहिंग्लज कला अकादमीच्या ‘नागीण’ कथेची अंतिम फेरीत निवड झाली आहे. चाळीसगाव रंगगंध कलासक्त न्यासतर्फे या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अकादमीच्या ‘नागीण’ कथेच्या अभिवाचनासाठी पुंडलिक परीट, डॉ. संभाजी जगताप, विशाखा जोशी, मधुरा हराडे, राजश्री कोले, शिवाजी पाटील, केंपाण्णा कांबळे यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीत ४१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यांपैकी अमेरिकेतून आठ आणि दुबईतून तीन स्पर्धकांनी सहभाग घेतला. २४ ते २७ डिसेंबरअखेर सायंकाळी सात ते १० या वेळेत अंतिम फेरीतील अभिवाचन होणार आहे.
-------------------------
गडहिंग्लजला निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी तीर्थक्षेत्र विकास निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन झाले. नूल येथील रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज व सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संतोष हुंडेकरी, सागर मांजरे, आदी उपस्थित होते.
------------------------
हलकर्णी बाजारात फळांची विक्री
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) बाजारपेठेत मार्गशीर्ष महिन्यानिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची विक्री झाली. फळांबरोबरच लक्ष्मीपूजनासाठी लागणारे अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. व्यापाऱ्यांनी २५ रुपयांना पाच फळांचा संच विकला.